हरभजन सिंगने केले भारतीय संघाचे अभिनंदन!

काल झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे दुसरा डाव ६ षटकांचाच खेळवावा लागला.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचे काम भारताच्या गोलंदाजांनी चोख केले. सामन्याचा पहिला डाव १८.४ षटकांचा झाला. त्यात ऑस्ट्रेलियाला फक्त ११८ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर भारताला पावसाच्या व्यत्ययानंतर ६ षटकात ४८ धावा करण्याचे आव्हान मिळाले.आणि भारताने ते एका विकेटच्या बदल्यात ते पूर्ण केले.

यानिमित्ताने भारताच्या फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने ट्विट करून भारतीय गोलंदाजांचे तसेच भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. त्याच बरोबर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही भारतीय संघाचे अभिनंदन केले. सध्या शमी रणजी सामना खेळत आहे.

भारताचा पुढचा टी २० सामना गुवाहाटीला १० ऑक्टोबरला होईल. भारत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० असा पुढे आहे. पुढचा सामना जिंकत मालिकाही जिंकण्याचा भारतीय संघ प्रयन्त करेल.