झहीर खान भारताचा चांगला गोलंदाजी प्रशिक्षक होऊ शकतो – हरभजन सिंग

भारताच्या सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला हरभजन सिंगने मंगळवारी झहीर खानचे नाव भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक सुचविले. त्याच्या मते झहीर खान भारताचा चांगला गोलंदाजी प्रशिक्षक शकतो. झहीर खान जो की हरभजनचा माजी संघसहकारी होता आणि आयपीएलमध्ये दिल्लीचा कर्णधारही होता. त्याला पाठिंबा देताना भज्जीने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर केला.

भज्जीने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे, “झहीर खान हा माझ्या मते वेगवान भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे”.

सध्या भारताचा मुख प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगार आहेत. वेगवान भारताचा गोलंदाजी प्रशिक्षकाची जागा मोकळी आहे. झहीर खान जो २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने आंतररराष्ट्रीय कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये ३११ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २८२ विकेट्स घेतल्या आहेत. आता पाहुयात बीसीसीआय कोणाला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडतंय.