किडनीच्या आजाराने त्रस्त दिग्गज खेळाडूच्या मदतीला हरभजन सिंग

आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण पदक आणि ध्यानचंद पुरस्कार विजेते 64 वर्षीय हकम सिंग भट्टल सध्या त्यांच्यां कि़डनी आणि लिव्हरच्या आजारपणामुळे मृत्युशी झुंज देत आहेत.

त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्यावर उपचार करने त्यांच्या परीवाराला अवघड जात आहे.

गेल्या कही दिवसांपासून सरकारकडून मदत मागूनही हकम सिंग भट्टल यांना काही मदत मिळत नव्हती.

याचा उलगडा एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करुन केला होता.

हकम सिंग भट्टल यांची ही अवस्था पाहूण, भारताचा फिरकीपटू हरभजने सिंगने एएनआयच्या ट्विटला रिट्विट करत हकम सिंग भट्टल यांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक मागितला आहे.

यापूर्वीही हरभजन सिंगने पंजाब रणजी संघातील आपल्या संघसहकाऱ्याला उपचारासाठी मदत केली होती.

हकम सिंग भट्टल यांनी 1978 साली बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्रॅक फिल्ड क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवले होते.

हकम सिंग भट्टल यांना त्यांच्या या कामगिरीसाठी 2008 साली भारत सरकारने ध्यानचंद पुरस्कार दिला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-पहिल्या सामन्यातच दडलाय भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा निकाल

-आर अश्विन-दिनेश कार्तिकच्या तमिळ तडक्याने इंग्लिश फलंदाज त्रस्त