‘हे कधी, केव्हा आणि कशासाठी ?’, हरभजनचा सायमंड्सला प्रश्न

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अॅण्ड्रू सायमंड्सने पुन्हा एकदा ‘मंकीगेट’ प्रकरण उखरून काढले आहे. या प्रकरणाला सुमारे दहा वर्षे झाली असली तरी सायमंड्सच्या जीवनातील तो एक न विसरण्याजोगा किस्सा बनला आहे.

“जेव्हा आम्ही 2011ला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळत होतो तेव्हा हरभजनने माझी माफी मागितली. माफी मागताना तो रडलासुद्धा”, असे सायमंड्सने फॉक्स क्रिकेटच्या डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्ट आणि ब्रेट ली हे दोघेही उपस्थित होते.

सायमंड्सच्या या विधानावर मात्र भारतीय फिरकीपटू गोंलदाज हरभजन सिंगने ‘मी कधी, काय आणि कशासाठी माफी मागितली’ असे प्रश्न ट्विटरवर विचारले असून त्याने सायमंड्ने केलेली विधाने फेटाळली आहेत.

क्रिकइन्फोनुसार, “मी आणि हरभजन एका बार्बेक्यु पार्टीमध्ये भेटलो होतो. तेव्हा तेथे आमचे सगळे संघसहकारी होते. हरभजन माझ्याकडे आला असता त्याने मला तुझ्याशी काही बोलायचे आहे असे म्हणाला. तेव्हा त्याने मला सिडनीमध्ये जे काही झाले याबद्दल मी तुझी माफी मागतो. मी तुला, तुझ्या कुटुंबाच्या भावनांना धक्का दिला याबद्दल मला माफ कर. मी तसे करायला नको होते”, असे सायमंड्स म्हणाला.

“हे सगळे बोलून झाल्यावर तो रडत होता. मग आम्ही दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले”, असेही सायमंड्स पुढे म्हणाला.

भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने मला ‘मंकी’ म्हटले होते, असा आरोप सायमंड्सने केला होता. ही घटना 2008मध्ये सिडनी कसोटी सामन्या दरम्यान झाली होती. पण हरभजनने या आरोपांचा स्विकार केला नव्हता. तसेच भारतीय संघाने तो दौरा अर्धवट सोडण्याचा विचारही  केला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर पेक्षा १३ डाव कमी खेळताना केला मोठा विश्वविक्रम

कसोटीमधील चौथ्या क्रमांकावरची कोहलीने केली ‘विराट’ कामगिरी

तब्बल २६ वर्षांनंतर पर्थमध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली बनला केवळ चौथा भारतीय