हरभजन सिंगने दिल्या युवराजला ३००व्या सामन्यासाठी खास शुभेच्छा

भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आज कारकिर्दीतील ३००वा सामना बांगलादेश संघाविरुद्ध खेळत आहे. २००० साली सुरु झालेल्या या प्रवासात युवराज बरोबर हरभजन सिंग कायमचं साक्षीदार राहिलेला आहे. आज होणाऱ्या या सामन्याच्या पूर्वसंध्येला हरभजन सिंगने एक खास व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे ज्यात त्याने या सामन्यासाठी आपल्या मित्राला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यात हरभजन म्हणतो, “आज मी एका खास व्यक्तीबद्दल बोलणार आहे. जो माझा मित्र, भाऊ आहे तो अर्थात युवराज सिंग. युवी आज भारताकडून ३००वा सामना खेळत आहे. खूप मोठी उपलब्धी आहे ही. अभिनंदन युवी. ”

“जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा विचार केला नव्हता की मी १०० कसोटी खेळेल किंवा युवी ३०० एकदिवसीय सामने खेळेल. देवाची खरंच आमच्यावर कृपा राहिली आहे. आमची आमची दोस्ती कायम वाढत जात आहे. युवी तू खरा चॅम्पियन आहे. तो जीवनाच्या खेळात पण जिंकला आहेस. मैदानातही तू जिंकला आहेस. ३००व्या सामन्यातही तुझा विजय होवो. आणि आज तुलाच सामनावीर पुरस्कार मिळो. गॉड ब्लेस यु युवी. ”

भारत विरुद्ध बांगलादेश सामना आज दुपारी ठीक दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे.