तर गोलंदाज नाही तर मशीन करतील गोलंदाजी! – हरभजन सिंग

काल पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यादरम्यान वानखेडे येथे झालेल्या सामन्यातील खेळपट्टीवरून हरभजन सिंगने जोरदार टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून टीका करताना हरभजनने वानखेडेच्या क्यूरेटरवरही जोरदार टीकास्त्र सोडले.

हरभजनने यासाठी ट्विटर हे माध्यम निवडले. काल रात्री उशिरा केलेल्या ट्विटमध्ये हरभजन म्हणतो, ” ह्या सामन्याचा खरा सामनावीर वानखेडेचा क्यूरेटर आहे. ज्याच्यामुळे ४० षटकात ४६० + धावा झाल्या. वेळ जवळ आली आहे जेव्हा गोलंदाज नाही तर गोलंदाजीच्या मशीन गोलंदाजी करतील.”

काल मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्यात जोरदार फटकेबाजी पहायला मिळाली. भारताचा कसोटी विकेटकीपर वृद्धिमान सहाच्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने २० षटकात तब्बल २३० धावा केल्या. त्याला मुंबईनेही जोरदार उत्तर देताना २२३ धावा केल्या परंतु विजय मिळविता आला नाही.

हरभजन सिंगच्या ३ षटकात पंजाबच्या फलंदाजांनी तब्बल ४५ धावा केल्या.