आयपीएल २०१९मध्ये हा खेळाडू ठरणार सर्वात महागडा स्टार प्लेअर

भारत विरुद्ध विंडीज संघात 21 ऑक्टोबरला झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विंडीजचा फलंदाज शिमरॉन हेटमेयरने खेळलेल्या धडाकेबाज खेळीने त्याला 2019च्या आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) चांगलीच मागणी असणार आहे, असे भाकीत भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने केले आहे.

हेटमेयरने भारता विरुद्धच्या सामन्यात 5व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 78 चेंडूत 106 धावांची शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. हे त्याचे वनडेतील तिसरे शतक आहे.

हेटमेयरच्या या वादळी खेळीमुळे हरभजनने त्याला 2019च्या आयपीएलमधील मिलीयन डॉलर बेबी असे ट्विटरवर म्हटले आहे.

हेडमेयरची ही 13 वनडे सामन्यांतील तिसरी शतकी खेळी आहे. तसेच या तीनही शतकावेळी त्याचा स्ट्राइक रेट 135 असाच आहे. त्याचा या खेळीने विंडीजला प्रथम फंलदाजी करताना 8 विकेट्समध्ये 322 धावांचा पल्ला गाठता आला होता.

तर भारताच्या कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने यांनी शतके करत सामना 8 विकेट्सने जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या:

यावर्षी अशी कामगिरी करणारा विराट ठरला पहिलाच फलंदाज

१८९ सामने खेळल्यानंतर पहिल्यांदाच रोहित शर्माने केली अशी कामगिरी

रोहित हिटमॅन शर्माने केला क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम; गांगुली, सचिनलाही टाकले मागे