आर अश्विनवर केलेल्या टिकेमुळे हरभजनवर माजी दिग्गज भडकले

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या आर अश्विनने पहिलाच सामना खेळला होता. बाकीच्या सामन्यांमध्ये तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता. यामुळे भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने त्याच्यावर टिका केली होती.

हरभजनच्या या टिकेवर मात्र भारतीय दिग्गज क्रिकेटपटू फारुख इंजिनीयर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘अश्विन जेव्हा भारताला गरज होती तेव्हा दुखापतग्रस्त झाला. त्याच्या अनुपस्थितीत कुलदिप यादवने उत्तम गोलंदाजी केली होती. मग त्यालाच प्रथम क्रमांकाचा फिरकीपटू म्हणायला पाहिजे’, असे हरभजन एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.

“पहिला फिरकीपटू काय आणि दुसरा फिरकीपटू काय ते शेवटी फिरकीपटूच आहे. मला हरभजनने अश्विनबाबत बोललेली गोष्ट आवडली नाही”, असे फारुख म्हणाले. ते लीजेंड्स क्लबने आयोजित केलेल्या क्रिकेट क्लब ऑफ इंडिया या कार्यक्रमात बोलत होते.

“अश्विन हा एक उत्तम गोलंदाज आहे. हरभजनने सार्वजनिक ठिकाणी असे बोलायला नको होते.”, असेही फारुख म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्या वनडे सामन्यात या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी

खेलो इंडिया: पंधराशे मीटर धावण्यात महाराष्ट्राचा सौरभ रावत विजेता; उंच उडीत धैर्यशीलचे रुपेशी यश

मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान