हरभजन आणि सेहवागने व्यक्त केली वायू प्रदूषणाबद्दल चिंता !

भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी ट्विटवर वाढत्या वायू प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली आहे. सध्या उत्तर भारतात धुक्यामुळे समस्या वाढत आहेत आणि वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना श्वास घ्यायलाही त्रास होत आहे.

याबद्दल ट्विट करताना हरभजन सिंगने लिहिले आहे की “आपणच आपल्या हवामानाला नरक बनवत आहोत. प्रत्येक श्वासाबरोबर आपण स्मशानभूमीच्या जवळ जात आहोत.”

पुढच्या ट्विटमध्ये त्याने लिहिले आहे ” आपण हे सगळे ठीक आहे, पुढच्या महिन्यातपर्यंत ठीक होईल म्हणून दुर्लक्ष करतो हीच मोठी समस्या आहे. पण खरे बघायला गेले तर प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक दिवसाला ही परिस्थिती वाईट होत आहे.”

त्याबरोबरच वीरेंद्र सेहवागने ट्विट मध्ये लिहिले आहे की ” दिल्लीत इतकी थंडी आहे की—-. रिकामी जागा भरा.” तसेच सेहवागने दिवाळीच्या वेळीही वाढत्या वायू प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली होती.

दिल्ली सरकारने नुकतेच वायू प्रदूषण नियंत्रणासाठी १३ नोव्हेंबर पासून कारसाठी सम आणि विषम पद्धत वापरली जाईल असे घोषित केले आहे