अक्षर पटेल म्हणतो, धोनी- कोहलीला यात पराभूत करणे कठीण

तिरुवनंतपुरम । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या मते आजी-माजी कर्णधारांना धावण्याच्या शर्यतीत पराभूत करणे कठीण आहे. अक्षरने ट्विटरवर एक खास फोटो शेअर करत अशी पोस्ट केली आहे.

अक्षर म्हणतो, ” या दोन दिग्गजांना धावण्याच्या शर्यतीत हरवणे मोठे अवघड आहे. ” याबरोबर अक्षरने एक खास फोटोही जोडला आहे. ज्यात अक्षर, धोनी आणि कोहली धावताना दिसत आहे.

भारतीय संघाने आज येथे सराव केला. भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील शेवटचा टी२० सामना येथे होणार आहे. परंतु सामन्यापूर्वी केरळ राज्याच्या राजधानीच्या शहरात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. गेले ३ दिवस या शहरात पाऊस पडत असून आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर या शहरात पाऊस होत आहे.

ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा मध्यभाग कव्हरने झाकण्यात आला आहे. रविवारी दुपारीही येथे पाऊस पडला.

देशातील हे ५०वे आंतरराष्ट्रीय मैदान आहे.