हार्दिक पंड्याचा हॅलिकॉप्टर शॉट पाहुन त्याला असे म्हणाला एमएस धोनी…

दिल्ली। गुरुवारी(18 एप्रिल) आयपीएल2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात फिरोजशहा कोटला स्टेडीयमवर 34 वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने 40 विकेट्सने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.

मुंबईच्या या विजयात हार्दिक पंड्याने अष्टपैलू कामगिरी करत मोलाचे योगदान दिले. त्याने गोलंदाजी करताना 1 विकेट घेतली. तसेच तुफानी फलंदाजी करताना 15 चेंडूत 32 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले.

या तीन षटकारांपैकी तिसरा षटकार त्याने कागिसो रबाडाने टाकलेल्या शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हॅलिकॉप्टर शॉट खेळत मारला. त्याचा असा शॉट मारुन अनेकांना भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीची आठवण झाली. धोनीचा ‘हॅलिकॉप्टर शॉट’ हा ट्रेडमार्क शॉट आहे.

विशेष म्हणजे 3 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यातही हार्दिकने चेन्नईचा कर्णधार असणाऱ्या धोनी समोरच हॅलिकॉप्टर शॉट मारत लाँग ऑनला एक षटकार मारला होता. त्यावेळी हार्दिक म्हणाला होता की त्याला वाटले होते, धोनी म्हणेल चांगला शॉट होता. पण त्यावेळी मैदानात असे काही झाले नाही.

हार्दिक अनेक दिवसांपासून या हॅलिकॉप्टर शॉटचा सराव करत आहे. याबद्दल हार्दिक म्हणाला, ‘मी कधीही विचार केला नव्हता की सामन्यात हॅलिकॉप्टर शॉट खेळेल. मी त्याचा नेटमध्ये सराव करत होतो. मी त्यावेळी सामन्यानंतर धोनीच्या रुममध्ये गेलो आणि त्याला विचारले की हॅलिकॉप्टर शॉटचे माझे व्हर्जन आवडले का, त्याने सांगितले हे चांगले होते.’

गुरुवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरलेला हार्दिक म्हणाला, ‘मी स्वत:ला सांगत होतो की मला वाटत नाही मी यापेक्षा चांगला चेंडू फटकावू शकतो. मी नेटमध्ये मेहनत घेतली होती आणि माझ्यासाठी त्याचा चांगला फायदा झाला.’

हार्दिकने या आयपीएल मोसमात चांगला अष्टपैलू खेळ करताना आत्तापर्यंत 9 सामन्यात 43.60 च्या सरासरीने 218 धावा केल्या आहेत आणि 8 विकेट्सही घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

शास्त्रींच्या मते भारत नाही तर हा संघ आहे विश्वचषक विजेतपदासाठी प्रबळ दावेदार…

हा खेळाडू विश्वचषकासाठी संघात असल्याने कर्णधार कोहली आहे खूश

रैना, कोहलीनंतर हिटमॅन रोहित शर्मानेही केला तो खास विक्रम