हार्दिक पंड्या, केएल राहुल ऐवजी या खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आजपासून(12 जानेवारी) तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. पण ही मालिका सुरु होण्याआधीच भारताचे क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला निलंबित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

त्यांनी कॉफी विथ करन या शोमध्ये महिलांबद्दल विवादात्मक विधाने केली होती. त्यामुळेच त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

हे दोघेही सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून त्यांना लवकरच भारतात चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

याबरोबरच बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे की, ‘हे खेळाडू चौकशी पूर्ण होईपर्यंत आयसीसी, बीसीसीआय किंवा देशांतर्गत क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यात, कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही.’

या दोन्ही क्रिकेटपटूंनी त्याच्या कृतीबद्दल माफी मागितली आहे. परंतू त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने त्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेला मुकावे लागणार आहे.

या मालिकेत त्यांच्याऐवजी विजय शंकर, श्रेयस अय्यर, मनिष पांडे किंवा रिषभ पंत यांना संघात संधी मिळू शकते. पंतला या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्याचे निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसादने सांगितले होते. परंतू आता त्याला पुन्हा बोलावले जाऊ शकते.

त्याचबरोबर मनिष पांडे आणि श्रेयस अय्यरलाही संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

तसेच पंड्या आणि राहुलला कदाचीत या वनडे मालिकेनंतर होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकावे लागण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का देणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा दिग्गजांच्या यादीत समावेश

अँडी मरेची यावर्षीची विंब्लडन असेल शेवटची स्पर्धा

अखेर केएल राहुल, हार्दिक पंड्याला परतावे लागणार मायदेशी, कॉफी विथ करन प्रकरण अंगलट