म्हणून हार्दिक पंड्याने मागितली इशान किशनची माफी!

मुंबई| मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात 17 एप्रिलला झालेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने काल यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनची माफी मागितली आहे.

या सामन्यादरम्यान हार्दिकने फेकलेला चेंडू इशानच्या डोळ्याच्या जवळ लागला होता. ही घटना बेंगलोरचा संघ फलंदाजी करत असताना 13 व्या षटकात घडली. क्षेत्ररक्षण करत असलेल्या हार्दिकने यष्टीरक्षक इशानच्या दिशेने चेंडू फेकला, जो थेट इशानच्या चेहऱ्यावर जावून आदळला. 

यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. त्याच्याऐवजी आदित्य तारेने यष्टीरक्षण केले होते. यासाठीच हार्दिकने ट्विटरवरून  इशानची माफी मागितली आहे.  

इशानला मुंबई इंडीयन्सने 6.2 कोटींना संघात सामील करून घेतले होते. इशानने आत्तापर्यंत 20 आयपीएल सामन्यात 21.68 च्या सरासरीने 412 धावा केल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या: 

जयदेव उनाडकतला ११ कोटी रुपयांवरून डिवचणाऱ्यांना या दिग्गजाने खडसावले

फक्त आणि फक्त याच खेळाडूमूळे विराट दक्षिण आफ्रिकेत झाला यशस्वी

चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांची खास ट्रेन येतेयं पुण्यात