Video: असा झाला हार्दिक पंड्याचा वाढदिवस साजरा

११ ऑक्टोबरला भारतीय संघातील स्टायलिश अष्टपैलू हार्दिक पंड्याने आपला २४ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसाचा विडिओ स्वतः पांड्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

त्याने व्हिडीओ पोस्टवर लिहिले आहे की “सगळ्यांचा वाढदिवस वर्षातून एकदा येतो… बदला ‘गोड’ होता.” या व्हिडिओमध्ये हार्दिक भारतीय संघाबरोबर आपला वाढदिवस साजरा करताना दिसला. त्याने केक कापल्यावर सर्वांनी त्याचा चेहरा केकने भरवला आहे. त्याला केक लावण्यात संघ सहकारी युजवेंद्र चहल, रोहित शर्मा, मनीष पांडे हे पुढे होते.

त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी त्याला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या होत्या.

हार्दिक पंड्याच्या फॉर्मचा सध्या संघाला चांगलाच फायदा होत आहे. त्याच्या अष्टपैलू खेळाणे संघात समतोल साधला गेला आहे. गुजरातमधील चोर्यासी गावात जन्मलेल्या हार्दिक पंड्याने २६ जानेवारी २०१६ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी २० सामन्यात भारतीय संघात पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने २ बळी घेतले होते.

आत्तापर्यंत हार्दिकने ३ कसोटी सामने खेळले आहेत त्यात त्याने १७८ धावा केल्या आहेत यात त्याचे एक शतक तर एक अर्धशतकही सामील आहे. त्याचबरोबर ४ बळीही त्याच्या नावावर आहेत.

त्याबरोबर २६ वनडेत ४० च्या सरासरीने ५३० धावा केल्या आहेत आणि ३४ च्या सरासरीने २९ बळी घेतले आहे. तसेच त्याने २१ टी २० सामन्यात ११च्या सरासरीने १२५ धावा केल्या आहेत तर २७ च्या सरासरीने १६ बळी घेतले आहेत.