ती मुलगी कोण? हार्दिक पंड्याकडून स्पष्टीकरण

गेले दोन-तीन दिवस सोशल मीडियावर हार्दिक पंड्याचा एक फोटो एका मुलीबरोबर शेअर होत होता आणि त्याबद्दल जोरदार चर्चा होती. परंतु या अष्टपैलू खेळाडूने आता समोर येत ती मुलगी आपली बहीण असल्याचं म्हटलं आहे.

hardikpandya_official या इंस्टाग्राम अकाउंटवरून ३ दिवसांपूर्वी एक फोटो पोस्ट करण्यात आला होता. हे अकाउंट क्रिकेटरचे आणि खासकरून हार्दिकचे फोटो शेअर करत असते.

 

यामुळे डीएनए या न्यूज पोर्टलने याची बातमी केली. तसेच ही अनोळखी मुलगी कोण असा प्रश्न केला.

 

हार्दिकने स्वतः आपल्या ट्विटरच्या माध्यमातून याला उत्तर दिले आहे. हार्दिक म्हणतो, ” शंका दूर झाली आहे ती माझी बहीण आहे. ”

लवकरच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिका सुरु होणार आहे. हार्दिककडून याही मालिकेत मोठ्या अपेक्षा आहेत.