गुवाहाटी शहरात पाऊल ठेवताच हार्दिकला मिळाली ही गोड बातमी

गुवाहाटी । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा सध्या मैदानावर आणि मैदानाबाहेर जोरदार लोकप्रिय आहे. आज या खेळाडूने एक खास ट्विट करून एक गोड बातमी दिली आहे.

हार्दिक पंड्याच्या ट्विटरवर फॉलोवर्सची संख्या सध्या १ मिलियन झाली आहे. सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या लोकांच्या यादीत जगात हार्दिकचा क्रमांक जरी ३२२६ असला तरी भारतात त्याचा क्रमांक २००च्या आत आहे.

हार्दिक म्हणतो,

” मी आताच गुवाहाटी शहरात पोहचलो आहे. हे एक सुंदर शहर आहे. मी पहिल्यांदाच येथे आलो आहे आणि मला एक गोड बातमी समजली की मला ट्विटरवर तब्बल १ मिलियन लोकांनी फॉलोव केले आहे. ही एक मोठी गोष्ट आहे. तुम्ही चाहत्यांनी मला कायमच भरभरून प्रेम दिले आहे कायम पाठिंबा दिला आहे त्यामुळे मी तुमचा मनापासून आभारी आहे. “