विराट कोहलीप्रमाणेच हार्दिक पंड्याही होता सामनावीराचा तितकाच दावेदार

नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी मोठा विजय मिळवला.

भारताने जिंकलेल्या या सामन्यात विराट कोहलीने दोन्ही डावात मिळुन बरोबर २०० धावा केल्या. या २०० धावांत विराटने २१ चौकार मारले होते.

हार्दिक पंड्याने पहिल्या डावात फलंदाजी करताना १८ तर दुसऱ्या डावात ५२ धावा अशा एकुण ७० धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजीत इंग्लंडच्या पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात १ विकेट अशा एकुण ६ विकेट्स घेतल्या होत्या.

यामुळे या सामन्यात सामनावीर पुरस्कार नक्की कुणाला द्यावा यावर चाहत्यांसह सर्वच संभ्रावस्थेत होते. परंतु अखेर विराट कोहलीला या सामन्यात सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने भाष्य केले आहे. ” विराटच्या दोन्ही खेळी महत्त्वाच्या होत्या. पहिल्या डावातील खेळीचे विजयाचा पाया रचला तर दुसऱ्या डावातील खेळीने भारताला लक्ष्याच्या जवळ नेले. हार्दिकने तेवढीच महत्त्वाची कामगिरी केली. विशेषकरुन पहिल्या डावातील खेळी महत्त्वाची होती. दोन्ही खेळाडूंनी केलेल्या खेळी या डावात महत्त्वाच्या होत्या. मी त्यांना सामनावीर पुरस्कार विभागुन दिला असता. ” असे सचिन म्हणाला.

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना साउथॅंप्टन येथे ३० आॅगस्टपासून सुरु होणार आहे. 

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती

विराट कोहलीचा कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा डंका

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश