वर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश!

विंडीजचा संघ ३१ मे रोजी विश्व एकादश (वर्ल्ड ११) बरोबर एक टी२० सामना लॉर्ड्स येथे खेळणार आहे. या सामन्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून तो वेस्ट इंडिजमधील मैदानांची नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी खेळवला जाणार आहे.

या सामन्यात खेळणाऱ्या ८ खेळाडूंची नावे आता जाहीर झाली आहे. त्यात २ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक हे खेळाडू या सामन्यात विश्व एकादशकडून खेळतील.

यापुर्वी शाकिब उल हसन, राशिद खान आणि तमिम इक्बाल या खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्यासाठी होकार दिला आहे. तसेच शाहिद आफ्रिदीबरोबर शोएब मलिक आणि थिसारा परेरा विश्व एकादश (वर्ल्ड ११) संघाकडून या सामन्यात खेळणार आहेत.

य़ात स्पर्धेत भाग घेत असलेल्या खेळाडूंची नावे-
शाकिब उल हसन, राशिद खान, तमिम इक्बाल, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, थिसारा परेरा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक

 

शाहिद आफ्रिदीचे ५वे कमबॅक-

शाहिद आफ्रिदीचे हे ५वे कमबॅक मानले मानले जात आहे. त्याने आंतरराष्ट्रीय सामना २५ मार्च २०१६ रोजी खेळला असून १९ फेब्रूवारी २०१७मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

तर तो पीएसएलमध्ये १८ मार्च २०१८ रोजी कराची किंग्जकडून शेवटचा सामना खेळला होता. त्याने आपण ही शेवटची स्पर्धा खेळत असल्याचे तेव्हा म्हटले होते.  परंतू आता तो पुन्हा आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणार आहे.  

महत्त्वाच्या बातम्या –

-अबब! पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप 

-संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने 

-यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने 

-ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची 

-धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी 

-या कारणामुळे विराटला झाला 12 लाख रूपयांचा दंड 

-बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला

-पराभव झाला तरीही हा विक्रम करत कोहली भाव खाऊन गेला 

-असा एक कारनामा ज्यासाठी टी२०मध्ये खेळाडू करतात जिवाचे रान