हार्दिक पंड्याने विजयानंतर असे केले सेलेब्रेशन !

दिल्ली । परवा भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला वनडे मालिकेत २-१ असे पराभूत करून सलग ७ वनडे मालिका जिंकायचा पराक्रम केला. त्यानंतर काल भारतीय संघ दिल्ली येथे दाखल झाला.

दिल्ली येथे दाखल होताच अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने एक डिनरचा खास फोटो शेअर केला आहे ज्यात दिल्लीकर खेळाडू शिखर धवन आणि सलामीवीर केएल राहुल दिसत आहेत.

केएल राहुलला वनडे मालिकेसाठी वगळण्यात आले होते परंतु त्याचे टी२० संघात पुनरागमन झाले आहे. महाराष्ट्रीयन खेळाडू केदार जाधवला मात्र टी२० मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले आहे.

केएल राहुल संघाबरोबर बऱ्याच दिवसांनी परतल्यामुळे हार्दिकने आपल्या या मित्राबरोबर डिनर घेणे पसंत केले. हार्दिक आणि केएल राहुल हे चांगले मित्र असून सतत सोशल मीडियावर ते आपले फोटो शेरा करत असतात.

View this post on Instagram

Dinner with the boys! 🍝

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

दिल्लीतील ज्या हॉटेलमध्ये संघ थांबला आहे तेथील एक खास विडिओही एका चाहत्याने शेअर केला आहे.

भारतीय संघ उद्यापासून न्यूजीलँड विरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी सज्ज होत आहे. हा सामना दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर होणार आहे.

त्याचमुळे आज भारतीय संघातील खेळाडू फिरोजशाह कोटला मैदानावर टी२० सराव करणार आहेत. हा सामना दिग्गज वेगवान गोलंदाज नेहराचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.