हार्दिक पंड्याचे खणखणीत अर्धशतक, खेचले सलग ३ षटकार

चेन्नई । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याने खणखणीत अर्धशतक केले आहे. त्याने ५९ चेंडूंचा सामना करताना ५७ धावा केल्या आहेत.

या खेळीत हार्दिकने ३ षटकार आणि ३ चौकार खेचले आहेत. ३७व्या षटकात त्याने एक चौकार आणि ३ षटकार खेचले. विशेष म्हणजे हे तीनही षटकार त्याने सलग खेचले. हार्दिक पंड्याने अशी कामगिरी तीन वेळा केली आहे.

दुसऱ्या बाजूला माजी कर्णधार धोनी ५५ चेंडूत २९ धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/BCCI/status/909371097023365122