श्रीलंका दौरा: हार्दिक पंड्याला मिळू शकते आज कसोटी पदार्पणाची संधी, विराटने दिले संकेत

गॉल :आजपासून येथे सुरु होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याला संधी मिळू शकते. याचे संकेत काल कर्णधार कोहलीने पत्रकार परिषदेत दिले आहेत.

हार्दिक पंड्याने आजपर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेषतः एकदिवसीय सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. त्याने त्याने १७ एकदिवसीय सामन्यांत ४१.२८ च्या सरासरीने २८९ धावा केल्या असून १९ विकेट्स देखील मिळवल्या आहेत.

हार्दिक पंड्या बद्दल बोलताना विराट म्हणाला की, आमच्याकडे हार्दिक पंड्यासारखा क्रिकेटपटू ज्यात विकेट घेण्याचीही क्षमता आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याची शक्यता अधिक आहे.

जर हार्दिक पंड्याला संघात स्थान दिले तर संघात समतोल साधला जाईल असेही विराट पुढे म्हणाला.

भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना आज सकाळी १० वाजता गॉल येथे सुरु होणार आहे.