हार्दिक पंड्या अडकणार आयसीसीच्या जाळ्यात!

भारत-इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात भारत 107 धावांवर सर्वबाद झाला आहे.

त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इंग्लंडचा युवा फलंदाज ओली पोपला 20 व्या षटकाच्या 2 दुसऱ्या चेंडूवर पायचीत केले होते.

त्यावेळी आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या 20 वर्षीय ओली पोपला पंड्याने शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.

पंड्याच्या या कृतीने आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.1.7 चा भंग झाला आहे. हे प्रकरण सामना अधिकाऱ्यांनी गाभीर्याने घेतल्याल पंड्याला आयसीसीकडून होणाऱ्या कारवाईला समोर जावे लागण्याची शक्यता आहे.

यापूर्वी भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मानेदेखील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या डावात डेव्हिड मालनला बाद केल्यानंतर अपशब्द वापरले होते.

याप्रकरणी इशांत शर्माला आसीसीच्या आचारसंहीतेचा भंग केल्याबद्दल 1 डिमेरीट गुण आणि सामन्याचे 15 टक्के मानधन कापण्याचा निर्णय सामना अधिकाऱ्यांनी घेतला होता.

लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने तिसऱ्या दिवसाखेर 6 बाद 357 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 250 धावांची आघाडी घेतली आहे. 
इंग्लंडकडून या डावात अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने शतक तर जॉनी बेअरस्टोने अर्धशतक केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-लॉर्ड्स कसोटी- तिसऱ्या दिवशीच्या लंचला टीम इंडियाने मारला बीफ वर ताव, चाहत्यांनी सुनावले खडे बोल

-सचिन तेंडुलकर म्हणतो कसोटी क्रिकेट वाचवायचे असेल तर हे करायलाच हवे