भारताला तिसरा धक्का, हार्दिक पंड्या बाद

कोलंबो, श्रीलंका । येथे सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला चौथा झटका हार्दिक पंड्याच्या रूपाने बसला आहे. आज पंड्याला कर्णधार कोहलीने चौथ्या स्थानी बढती दिली होती परंतु त्या संधीचे सोने करता आले नाही. पंड्या १९ धावांवर बाद झाला.

हार्दिक पंड्याला या मालिकेत दुसऱ्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली होती. त्यात तो ० धावांवर बाद झाला होता. आज तो पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.

अँजेलो मॅथेवच्या गोलंदाजीवर वाणिदु हसरंगाकडे झेल देऊन तो परतला. सध्या मैदानावर लोकेश राहुल आणि मनीष पांडे हे खेळाडू खेळत असून सलामीवीर रोहित शर्मा १०४ धावांवर बाद झाला आहे. भारत सद्यस्थितीत ४ बाद २६२ धावा आहेत.