हार्दिक पंड्या भारताचा २८९ वा कसोटी खेळाडू

आज हार्दिक पंड्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने कर्णधार विराट कोहलीकडून कसोटी कॅप स्वीकारली.

हार्दिक पंड्या हा भारतच २८९वा कसोटी खेळणारा खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी कुलदीप यादवने धरमशाला येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीमध्ये भारताकडून पदार्पण केले होते. तो भारताचा २८८ वा कसोटी खेळणारा खेळाडू बनला होता.

हार्दिक पंड्याने आजपर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेषतः एकदिवसीय सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. त्याने त्याने १७ एकदिवसीय सामन्यांत ४१.२८ च्या सरासरीने २८९ धावा केल्या असून १९ विकेट्स देखील मिळवल्या आहेत.