हरेंद्र सिंग यांची पुरूष हॉकी संघाच्या पदावरून गच्छंती

भारतीय पुरूष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना तडकाफडकी पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. 2018मध्ये वरिष्ठ संघाची कामगिरी निराशाजनक झाल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले आहे. तर भारतीय हॉकी संघटनेने त्यांना ज्युनियर पुरुष हॉकी संघांचे प्रशिक्षकपद दिले आहे.

भारतीय हॉकी संघटनेने सिंग यांची 2018च्या मे महिन्यात पुरूष वरिष्ठ संघाची मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणुक केली होती. त्यांच्या आधी सुजर्ड मारीजने हे संघाचे प्रशिक्षक होते. मात्र मारीजने यांना भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली.

‘2018 मध्ये भारतीय वरिष्ठ पुरूष संघाची कामगिरी खुपच निराशाजनक झाली आहे. यामध्ये आम्हाला हवे तसे निकाल मिळाले नाही’, असे हॉकी इंडियाने सांगितले आहे.

गतविजेत्या भारताने इंडोनेशियात झालेल्या एशिया स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. तर भुवनेश्वर येथे झालेल्या हॉकी विश्वचषकात उपांत्यपूर्व सामन्यात नेदरलॅंड्सकडून 1-2 असे पराभूत व्हावे लागले होते.

सिंग यांनी ज्युनियर पुरुष हॉकी संघांचे 2016च्या लखनऊमध्ये झालेल्या उत्तर प्रदेश ज्युनिअर हॉकी विश्वचषकात प्रशिक्षकपद भूषविले होते. तसेच 2017 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

‘भारतीय हॉकी संघटना लवकरच संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज स्विकारणार आहे. येत्या 23 मार्चपासून सुलतान अझलान शाह चषकाला सुरूवात होत असल्याने खेळाडू फेब्रुवारी महिन्यात सरावाला सुरूवात करणार आहे’, असेही हॉकी इंडियाने रिपोर्टमध्ये दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भविष्यात टीम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतो बुमराह, पहा व्हीडिओ

मुंबईकर शार्दुल ठाकूर या कारणामुळे आहे निराश

खेलो इंडिया- जिम्नॉस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या श्रेयाला रौप्य ; क्रिशाला ब्रॉंझ