तिसरी कसोटी: हार्दिक पंड्याचे दणदणीत शतक !

पल्लेकेल: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पंड्याने आपली कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक लगावले आहे. त्याने हे शतक करण्यासाठी फक्त ८६ चेंडू घेतले. या खेळीत त्याने ८ चौकार तर ७ षटकार लगावले आहेत.

हार्दिक जेव्हा काल फलंदाजीला आला तेव्हापासूनच श्रीलंकन गोलंदाजांविरुद्ध त्याने फटके बाजी चालू केली होती आणि श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंडिमलने त्याच्याविरुद्ध खूपच बचावात्मक क्षेत्ररक्षण लावले होते. यामुळे हार्दिक सेट झाला आणि त्याने शतक लगावले.

आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना हार्दिक पंड्याने भारताकडून आज सर्वात वेगवान शतक लगावले. पंड्याच्या या खेळीमुळेच भारताने लंचआधीच्या सत्रात ४८७ धावांची मजल मारली आहे. आता भारताकडून हार्दिक पांड्य १०८ धावांवर खेळत आहे तर उमेश यादव ३ धावांवर खेळत आहे.

पांड्यच्या कसोटी कारकिर्दीतील हा फक्त फक्त तिसरा सामना आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात कसोटी पदार्पण केले होते आणि त्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली होती.