हरमनप्रीत कौरवर शुभेच्छांचा वर्षाव

महिला विश्वचषकात ११५ चेंडूत १७१ धावांची नाबाद स्फोटक फलंदाजी करणाऱ्या हरमनप्रीत कौरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात अनेक क्रिकेटपटू तसेच खेळाडूंसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांचाही समावेश आहे.

सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, विराट कोहली, अनिल कुंबळे, कपिल देव, चेतेश्वर पुजारा, वीरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटू अंजुम चोप्रा, मोहमंद कैफ, हर्षा भोगले, संजय मांजरेकर यांचा समावेश आहे.