जेव्हा हरमनप्रीत कौरचं घेते स्म्रीती मंधानाचा अप्रतिम झेल, पहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सिडनी थंडर आणि स्म्रीती मंधाना होबार्ट हरिकेन्स या संघांकडून खेळत आहेत.

कौर ही तिच्या उत्कृष्ठ फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणासाठी ओळखली जाते. आज झालेल्या टी20 सामन्यामध्ये तिने हरिकेन्स विरुद्धच्या सामन्यात एक असाच अप्रतिम झेल घेतला. मात्र हा झेल घेतल्यावर तिने आनंद व्यक्त केला नाही.

मंधाना हरिकेन्सकडून सलामीला आली असता तिने दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 29 धावा केल्या. यात तिने संथ गतीने सुरूवात केल्यावर मोठे शॉट्स खेळायला सुरूवात केली. यातच तिने मारलेल्या एका शॉटवर मिड-ऑनवर थांबलेल्या कौरने उडी मारून तो झेल घेतला. हा झेल घेतल्यावर कौरने आंनद साजरा केला नाही.

या सामन्यात  हरिकेन्सने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 153 धावा केल्या. थंडर संघाने हे लक्ष्य 17.2 षटकातच पूर्ण करत सामना 6 विकेट्ने जिंकला. यामध्ये क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करणाऱ्या कौरला 10 धावाच करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

कोण आहे हा १६वर्षांचा खेळाडू जो ठरला आयपीएलमधील यंगेस्ट करोडपती

भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक

आयपीएल लिलावातील एवढे पैसे पाहुन त्या खेळाडूला आले टेन्शन