या दोन खेळाडू करणार महिलांच्या आयपीएल टी२० सामन्यात नेतृत्व

महिलांची टी२० चॅलेंज मॅच २२ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. हा सामना आयपीएल २०१८च्या क्वाॅलिफायर १ सामन्याच्या आधी खेळवला जाणार आहे.

या सामन्यात स्म्रिती मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोन संघांच नेतृत्व करणार आहे. या दोन संघांकडून आॅस्ट्रेलिया, न्युझीलंड तसेच इंग्लंडच्या महिला खेळाडू खेळताना दिसतील.

यावर्षी झालेल्या महिलांच्या विश्वचषकाला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांचा पाठिंबा लाभला होता. याचमुळे बीसीसीआयने महिला खेळाडूंसाठी खास सामन्याचे आयोजन केले आहे.