प्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय

प्रीमियर लीगमध्ये टोटेनहॅम हॉटस्परने फुलहॅमचा ३-१ असा पराभव केला. हॅरी केनने केलेल्या गोलनेच टोटेनहॅमचा विजय पक्का झाला होता.

इंग्लंडचा स्ट्रायकर केनने त्याच्या प्रीमियर लीगचा पहिला गोल केला. त्याने ७७व्या मिनिटाला हा गोल केला. लीगच्या तब्बल १४ सामन्यानंतर त्याला गोल करण्यात यश आले. केनने मागील हंगामातील ५९ सामन्यात ५२ गोल केले होते.

या सामन्यात पहिल्या सत्रात फक्त एकच गोल झाला. टोटेनहॅमचा लुकास मौराने ४३व्या मिनिटाला त्याचा प्रीमियर लीगचा पहिला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

अलेक्सांडर मिट्रोविचने फुलहॅमसाठी गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. फुलहॅमकडून पदार्पण करताना मिट्रोविचने १३ प्रीमियर लीगचे गोल केले आहेत. असा करणारा तो लीव्हरपूलच्या मोहम्मद सलाहनंतर दुसराच फुटबॉलपटू आहे.

७४व्या मिनिटाला कायरन ट्रीपरने मारलेल्या फ्री-कीकने टोटेनहॅमचा विजय पक्का झाला. यावेळी त्याने फिफा विश्वचषकात क्रोएशिया विरुद्धच्या सामन्याची आठवण झाली. तसेच सामनावीराचा पुरस्कार ट्रीपरला मिळाला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…

एफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द