स्मिथ धोनी ही जय वीरूची जोडी – हर्ष गोयंका

रायसिंग पुणे सुपरजायंट संघाचे मालक संजीव गोयंका यांचे बंधू आणि प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका हे आपल्या ट्विटमुळे आयपीएलच्या लिलावापासून चर्चेत आहेत. त्यात सुरुवातीच्या काळात त्यांना मोठ्या प्रमाणावर धोनी चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. परंतु यावेळी गोयंका यांनी नवीन ट्विट करून स्मिथ, धोनीला जय वीरूची जोडी म्हटले आहे.

संपूर्ण आयपीएल धोनी चाहत्यांच्या रोषाला सामोरे गेलेल्या गोयंका यांनी मुंबई विरुद्ध पुणे हा सामना सुरु असताना हा ट्विट केला. यात जय वीरूबरोबर तुलना करताना त्यांनी प्रसिद्ध कॉमेडियन लॉरेन आणि हार्डी यांच्याशीही तुलना केली.

जबदस्त जोडी: लॉरेन – हार्डी, जय-वीरू, स्मिथ- धोनी
“Outstanding combinations: Laurel- Hardy, Jai -Veeru, Smith- Dhoni#IPLfinal”

https://twitter.com/hvgoenka/status/866321936502202368
आयपीएलच्या सुरुवातीला झालेल्या वादामुळे एकप्रकारे धोनी चाहत्यांकडून पुन्हा असं नये म्हणून गोयंका असं तर करत नसतील ना ?