पहा: आंबटी रायडू आणि हर्ष गोयंका यांच्यातील ट्विटर वॉर

सध्या भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. धोनीवर एकवेळी पुण्याच्या आयपीएल संघाचे सहमालक असणाऱ्या हर्ष गोएंका यांनी मोठी टीका केली होती. धोनीची कामगिरीही तेव्हा ठीकठाक होती. परंतु धोनी चाहत्यांच्या मोठ्या रोषाला तेव्हा गोएंका यांना सामोरे जावे लागले होते.

सध्या श्रीलंका मालिकेत भारताचा हा खेळाडू अतिशय चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे सध्या भारतीय संघात नसलेला परंतु काही महिन्यांपूर्वी संघाचा सदस्य असणाऱ्या आंबटी रायडूने २३ ऑगस्ट रोजी धोनीच्या या खेळीचे कौतुक करत हर्ष गोयंका यांच्यावर निशाणा साधला. त्यात तो म्हणतो की हर्ष गोयंका यांना कुणीतरी आरसा द्यावा. धोनी चांगला खेळ करत आहे.

परंतु गोयंका यांनी योग्य संधीची वाट पाहत आंबटी रायडूवर पलटवार केला आहे. परवा आंबटी रायडूने चेन्नई शहरात एका वृद्धाला गाडीमधून उतरून मारहाण केली. तोच विडिओ आंबटी रायडूला टॅग करून त्यांनी चांगली खेळी आंबटी रायडू असे म्हटले आहे. पुढे त्यांनी कुणीतरी ह्या खेळाडूला आरसा देण्याचेही सुचवले आहे.

या दोघांच्या ट्विटरवादात चाहत्यांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले आहे.