हर्षा भोगले क्रिकेट समालोचनातील शेक्सपियर: वीरेंद्र सेहवाग

0 75

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले आज त्यांचा ५६वा वाढदिवस साजरा करत आहेत. ‘व्हॉइस ऑफ क्रिकेट’ अशी ओळख असणाऱ्या या दिग्गजाला सर्वच स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना भोगले यांना क्रिकेट समालोचनातील शेक्सपियर असे म्हटले आहे. सेहवाग आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” एका जबदस्त क्रिकेटपटूला आणि तेवढ्याच जबदस्त माणसाला अर्थात हर्षा भोगलेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. क्रिकेट समालोचनातील शेक्सपियर.”

वीरुचं आभार मानताना हर्षा भोगले यांनी सेहवागला एक आनंद देणार व्यक्तिमत्व आणि जबदस्त फलंदाज म्हटलं आहे.

सचिन तेंडुलकर, अंजुम चोप्रा. विक्रम साठ्ये, गौरव कपूर या दिग्गजांनीही  हर्षा भोगले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Loading...
%d bloggers like this: