जयदेव उनाडकतला ११ कोटी रुपयांवरून डिवचणाऱ्यांना या दिग्गजाने खडसावले!

मुंबई | सध्या आयपीएलमध्ये चाहत्यांच्या टीकेचा धनी ठरलेल्या जयदेव उनाडकतला क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. उनाडकत कुणाकडे पैसे मागायला गेला नव्हता त्यामूळे त्याला यासाठी जबाबदार धरणं चुकीचं असल्याच मतही हर्षाने व्यक्त केले आहे. 

जयदेव उनाडकतला राजस्थान राॅयल्सने ११.५ कोटी रुपये देऊन संघात घेतले आहे. काल राजस्थान राॅयल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात उनाडकतने ३ षटकांत ३४ धावा दिल्या परंतू त्याला एकही विकेट घेता आली नाही. यानंतर त्याला सोशल माध्यमांवर ट्रोल करण्यात आले. 

यावर आज क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी ट्विट करत जयदेव उनाडकतला पाठींबा दिला आहे. 

“माझा जयदेव उनाडकतला पाठींबा आहे. तो एक चांगल्या दर्जाचा खेळाडू असल्यामूळे टीका होणं हे ठिक आहे. परंतू त्याला लिलावात मिळालेल्या किंमतीवरून जे ट्रोल केलं जात आहे ते अजिबात योग्य नाही. कारणं त्याने ही रक्कम कुणाकडेही मागितली नव्हती. जर त्याने तशी मागितली असती तर ठिक होतं ” असं हर्षा आपल्या ट्विटमध्ये म्हणतो. 

यावर पुन्हा वाद वाढवणाऱ्या एका व्यक्तीलाही हर्षाने चांगलेच खडसावले आहे.