रोमहर्षक सामन्यात यूपी योद्धजवर हरियाणा स्टीलर्सचा विजय !

हरियाणा स्टीलर्सने यू पी योद्धाजला त्यांच्या घरच्या मैदानावर ३६-२९ असे हरवून या मोसमातील आपला दुसरा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानात यू पी योद्धाजचा हा सलग दुसरा पराभव आहे.

सामन्याच्या पहिल्या सत्रात यू पी योद्धाजचाच दबदबा होता पण हरियाणा स्टीलर्सच्या युवा रेडेर विकास कनडोलाच्या ९ गुणांच्या बदल्यात यू पी दुसऱ्या सत्रात दोन वेळा सर्वबाद झाली आणि सामन्याचा निकाल हरियाणा स्टीलर्सच्या बाजूने लागला.

सामन्याच्या १०व्या मिनिटांपासून यू पीकडे गुणांची बढत होती पण त्यांनी ती बढत शेवटच्या काही मिनिटात गमावली आणि सामना ही गमावला. सुरेंद्र नाडाने डिफेन्समध्ये आपला अफलातून फॉर्म कायम राखत ७ गुण मिळवले.

पहिल्या सत्रात यू पीला बढत मिळवून देण्यात रेडेर रिशांक देवाडिगा आणि डिफेंडर सागर कृष्णाचा मोठा वाटा होता. पण दुसऱ्या सत्रात त्यांना चांगली कामगीरी करता आली नाही. त्याच बरोबर यू पी चा कर्णधार नितीन तोमरही लयमध्ये दिसला नाही. सामन्याच्या शेवटच्या क्षणात हरियाणाच्या विकासने डू ओर डाय रेड मध्ये सुपर ट्यकल असताना २ गुण मिळवून सामन्याचा सामन्याचा निकाल लावला.