स्टार कबड्डीपटू सुरजीत नरवाल अपघातातून थोडक्यात वाचला

आज सकाळी झालेल्या एका अपघातात हरियाणा स्टीलर्सचा स्टार खेळाडू सुरजीत नरवाल थोडक्यात वाचला. याची माहिती त्याने स्वतःच इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.

त्या पोस्टमध्ये त्याने आपल्याला काहीही झाले नसल्याचे लिहिले आहे. “माझं दुदैव की माझा अपघात झाला आहे आणि माझे सदैव की मी सुरक्षित आहे. “

सुरजीत प्रो कबड्डीमधील एक चांगला रेडर असून त्याकडे कबड्डीचा मोठा अनुभव आहे. तो सर्विसेसकडून खेळतो.

२०१७च्या मोसमात प्रो कबड्डीमध्ये हरियाणा स्टीलर्सकडून खेळताना त्याने १७ सामन्यात ६३ गुणांची कमाई केली. त्यामुळेच त्याच्या संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवता आले होते.

तो लवकरच राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना दिसेल. ३१ डिसेंबरपासून ही स्पर्धा हैद्राबाद येथे होत आहे.