अखेर चिमुकल्याला मिळाली वसीम अक्रम कडून गोलंदाजी शिकण्याची संधी

काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका लहान मुलाच्या गोलंदाजीच्या व्हिडिओची चांगलीच चर्चा झाली. या ६ वर्षाच्या हसन अख्तरने चक्क इन-स्विंग आणि आऊट-स्विंग बॉल टाकून सर्वांना थक्क केलं होतं. त्याच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलेलं एक अतिशय प्रख्यात नाव म्हणजे पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि गोलंदाज वसीम अख्तर.

त्यानी त्या व्हिडिओवर पाकिस्तानमध्ये असलेल्या अश्या प्रतिभावान खेळाडूंचे कौतुक केले. सोबतच आपल्याला अश्या गोलंदाजांना प्रोत्साहन द्यायला नक्की आवडेल असेही तो म्हणाला होता. आणि जेव्हा काही पत्रकारांनी हसनला आपल्याला कोणाकडून गोलंदाजीचे प्रशिक्षण घ्यायला आवडेल असे विचारल्यावर त्याने देखील पटकन वसीम अख्तरचेच नाव घेतले.

आता जवळ जवळ एक महिन्यानंतर त्याचे हे स्वप्न पूर्ण झाल्याची चिन्ह दिसत आहेत. त्याला नुकतेच वसीम अक्रमने गोलंदाजीचे धडे दिले, आणि त्यातल्या अनेक बाबी समजवल्या.

वसीम अक्रमने ट्विट करून या छोट्या गोलंदाजाचे अभिनंदन केले. त्याने आपल्या ट्विट मध्ये या मुलाचे भविष्य अतिशय उज्वल आहे आणि याला पहिल्यापासून सर्व गोष्टींची चांगली माहिती आहे आणि नवीन शिकण्याची इच्छा आहे असे देखील नमूद केले.