भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या या खेळाडूला आयसीसीने सुनावली ही मोठी शिक्षा

अबुधाबी। 21 सप्टेंबरला एशिया कप 2018च्या सुपर फोरच्या फेरीत पाकिस्तानचा अफगाणिस्तानविरुद्ध सामना पार पडला. या सामन्यात गैरवर्तवणुक केल्याप्रकरणी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली, अफगाणिस्तानचा कर्णधार असघर अफगाण आणि फिरकी गोलंदाज राशीद खानला 15 टक्के मॅच फीचा दंड केला आहे.

त्याचबरोबर आयसीसीच्या आचार संहितेच्या लेव्हल 1 चा भंग केल्यामुळे या तिघांनाही 1 डिमिरीट पॉइंटही देण्यात आला आहे.

हसन आणि असघर यांना खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी असलेल्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.1.1 चे उल्लंघन केल्यामुळे दोषी ठरवण्यात आले आहे. हा नियम खिलाडूवृत्तीशी संबंधित आहे.

तसेच राशीदला कलम 2.1.7 नुसार दोषी ठरवण्यात आले आहे. हा कलम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाज बाद झाल्यानंतर चुकीचे शब्द, हावभाव किंवा वर्तवणुकीचा वापर करुन राग व्यक्त करण्याशी निगडीत आहे.

त्याचबरोबर हसन आणि राशीदला पहिल्यांदाच डिमिरीट पॉइंट मिळाला आहे. तर असघरला 24 महिन्यांच्या आत दुसऱ्यांदा डिमिरीट पॉइंट मिळाला आहे. त्याला फेब्रुवारी 2017 मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सामन्यात पंचाच्या निर्णयाविरुद्ध असंतोष दर्शविल्याबद्दल एक डिमिरीट पॉइंट देण्यात आला होता.

हसनला हा दंड करण्यात आला आहे कारण आफगाणिस्तान फलंदाजी करत असताना 33 व्या षटकात स्वत:च्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण केल्यानंतर तो चेंडू स्ट्राइकर हशमतुल्लाह शाहीदीच्या दिशेने फेकण्याची धमकी देण्यासारखे हावभाव केले होते.

याबरोबरच 37 व्या षटकार असघर धाव घेत असताना त्याने गोलंदाज हसनला खांद्याने  धक्का दिला. त्यामुळे असघरलाही दोषी ठरवण्यात आले आहे.

तर राशीदने पाकिस्तान फलंदाजी करत असताना 47 षटकात असीफ अलीला बाद केल्यानंतर तर्जनी बोट वर करुन फलंदाजाकडे रागाने पाहिले होते त्यामुळे त्यालाही दंड ठोठवण्यात आला आहे.

या तिन्ही खेळाडूंनी सामन्यानंतर आपली चूक मान्य केली असुन आयसीसीचे मॅच रेफ्री एलिट पॅनलचे सदस्य असलेले अॅन्डी पायक्रॉफ्ट यांनी केलेली कारवाईही मान्य केली आहे. त्यामुळे यावर अधिकृत सुनावणीची गरज नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

पाकिस्तानच्या या माजी दिग्गज गोलंदाजने एमएस धोनीशी केली शोएब मलिकची तुलना

हिटमॅन रोहित शर्मा या कारणामुळे पाकिस्तान विरुद्ध ठरणार हिट

टीम इंडियाविरुद्ध हे ३ खेळाडू पाकिस्तानला मिळवून देऊ शकतात एकहाती विजय

अजिंक्य रहाणेचा वनडेत तडाखा, टीम इंडियाची दारे पुन्हा ठोठावली