तरीही हाशिम अमला विराटची पाठ काही सोडेना !

कानपुर । हाशिम आमला आणि एबी डिव्हिलिअर्स हे जगातील असे दोन खेळाडू आहेत जे विराटच्या कोणत्याही विक्रमात आपणास कुठे ना कुठे दिसतात. 

विराटच्या वेगवान ६हजार धावा असो किंवा ८ हजार धावा असो यापैकी एक खेळाडू असतोच. विषय शतकांचा असो किंवा सरासरीचा विराटच्या पुढे मागे या दोन खेळाडूंची नावे येतातच. 

अगदी कालचेच उदाहरण घ्या ना ! विराट कोहलीला वनडेत २०१७मध्ये २हजार धावा करणारा पहिला आणि एकमेव खेळाडू बनला असे लिहिल्याचे नंतर केवळ २ तासांनीच अमलाने २ हजार धावांचा टप्पा पार केला. 

विराट कोहली या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१०४ धावा केल्या आहेत. विराटने कानपुर वनडेत ११३ धावा केल्या. विराटला यावर्षी २००० धावा करण्यासाठी केवळ ९ धावा गरजेच्या होत्या. 

विराटने यावर्षी ४० सामन्यात ४४ डावात फलंदाजी करताना ६०.११ च्या सरासरीने २१०४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ८ शतके आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे.

हे करत असताना अमलाने बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात ७० चेंडूत ८५ धावांची खेळी करताना २००० धावांचा टप्पा पार केला. विराटापेक्षा ५ सामने कमी खेळून त्याने हा विक्रम केला आहे. ३५ सामन्यात त्याने ५०.५६च्या सरासरीने त्याने ह्या वर्षी २०७३ धावा केल्या आहेत. 

यापूर्वीही अमलाने विराटचा वेगवान ६००० आणि ७००० धावांचा विक्रम मोडला आहे. वेगवान २५,२६, २७आणि २८ वनडे शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही आधी विराट अव्वल होता तर तो विक्रम अमलाने मोडला.

विशेष म्हणजे विराटने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ शतके केली आहेत तर दुसऱ्या स्थानी अमला असून त्याने ६ शतके केली आहेत. अर्धशतकांमध्ये मात्र अमलाने विराटला मागे टाकत ११ वेळा ५०चा टप्पा पार केला आहे तर विराटने ८ वेळा अर्धशतके केली आहेत.