युरोपा लीगसाठी चेल्सीमधून हे मोठे खेळाडू बाहेर

आज होणाऱ्या युरोपा लीगच्या पीएओके विरुद्धच्या सामन्यात चेल्सीचा स्टार फुटबॉलपटू एडन हॅजार्डचा संघात सहभाग नाही आहे. विश्रांतीच्या कारणामुळे त्याने या सामन्यातून माघार घेतली आहे. तसेच तो क्लबकडून परत कधी खेळेल हे निश्चित नाही.

हॅजार्डने 15 सप्टेंबरला झालेल्या कार्डीफ विरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रीक केली आहे. त्याच्या बरोबरच डेव्हीड लुइझ, मॅटेओ कोवासिच आणि इमरसन पालमैरी हे पण ग्रीक विरुद्ध खेळण्यास संघासोबत रवाना झाले नाही.

हॅजार्ड हा फिफा विश्वचषक संपल्यानंतर तीन आठवड्यानंतर त्याने सरावास सुरूवात केली. तसेच तो प्रीमियर लीगच्या सलग पाच सामन्यात खेळला आहे. यावेळी त्याने पाच गोल केले तर दोन गोल असिस्ट केले आहेत.

तसेच लुइझला सराव आणि आरामाची गरज आहे तर कोवासिच दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. हॅजार्ड प्रमाणेच टोटेनहॅम हॉटस्परचा आणि इंग्लंडचा स्ट्रायकर हॅरी केननेही अति तणावामुळे विश्रांती घेतली होती. तो रविवारी होणाऱ्या वेस्ट हॅम विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

“युरोपा लीगसाठी हॅजार्ड हा योग्य खेळाडू आहे. पण आता मी माझे मन बदलले आहे. तसेच त्याने मला सांगितले होते की तो कार्डीफ विरुद्धच्या सामन्यानंतर त्याला थकवा जाणवत होता”, असे सॅरी म्हणाले.

“कदाचित पीएओके विरुद्धच्या सामन्यात मिडफिल्डर रुबेन लोफ्टस चीकला संधी मिळू शकते पण तो खेळेल की नाही हे नक्की नाही”, असेही सॅरी पुढे म्हणाले.

“मी पीएओकेच्या चॅम्पियन्स लीगमधील प्ले ऑफचे सामने बघितले आहे. ते उत्कृष्ट खेळले आहेत. म्हणून त्यांच्या विरुद्धच्या सामन्यात आम्हाला गुण मिळवायचे असतील तर चांगलाच खेळ करावा लागणार आहे.”

तसेच चेल्सीने मिडफिल्डर इथान अम्पाडूसोबत नवीन पाच वर्षाचा करार केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एशिया कप २०१८: सुपर फोरचे सामने पूर्वनियोजित असल्याचा कर्णधारांचा आरोप?

मेस्सीने आठवी हॅट्ट्रीक करत रोनाल्डोला टाकले मागे