स्टिव्ह स्मिथ म्हणला, आर्चरने डोक्याला चेंडू मारला पण मला आऊट केले नाही…

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या ऍशेस मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू मानेच्या जवळ लागला होता. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते.

आता या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरला 4 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी स्मिथने तयारी सुरु केली आहे. चौथ्या सामन्याआधी जेव्हा स्मिथला विचारण्यात आले की तो आर्चरचे चेंडू खेळण्यासाठी त्याच्या फलंदाजीत काही बदल करणार आहे का.

यावर स्मिथ म्हणाला, ‘नाही, मी काही बदल करणार नाही. लोक बोलत होते की तो मला त्या सामन्यात (दुसऱ्या सामन्यात) वरचढ झाला होता. पण तो मला बाद करु शकला नाही.’

‘त्याने माझ्या डोक्यावर चेंडू मारला पण तो मला बाद करु शकला नाही.’

‘माझ्या विरुद्ध अन्य गोलंदाज जास्त यशस्वी झाले. हे मी म्हणू शकतो. मी त्यांचा जास्त सामना केला. त्यांनी माझी विकेटही घेतली. त्यामुळे मला वाटते की मला त्याबद्दल कोणतीही समस्या नाही.’

तसेच स्मिथ म्हणाला, ‘ते माझ्या डोक्याच्या जवळ चेंडू टाकत होते म्हणजेच ते मला स्टम्प किंवा पॅडवर चेंडू टाकून बाद करण्यात अपयशी ठरत होते.’

स्मिथला जेव्हा आर्चरचा चेंडू लागला होता तेव्हा त्याला फिल ह्यूजचा विचार मनात आला असल्याचेही स्मिथने सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्यूजचे 2014 मध्ये डोक्याला चेंडू लागून निधन झाले होते.

स्मिथ चौथ्या ऍशेस कसोटी सामन्याआधी त्याचा फिटनेस सिद्ध करण्यासाठी आजपासून(29 ऑगस्ट) डर्बीशायर विरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीची टीम इंडियात निवड होणे कठीण, पंतलाच मिळणार पसंती..

श्रीलंकेचा ‘मिस्ट्री स्पिनर’ अजंता मेंडीसची क्रिकेटमधून निवृत्ती

…तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!