पुढच्या वनडे मालिकेत हा खेळाडू खेळणार चौथ्या क्रमांकावर, शास्त्रींचा मोठा खुलासा

भारतीय क्रिकेट संघातील चौथा क्रमांक मागील अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. वनडेत या क्रमांकावर भारतीय संघाने अनेक खेळाडूंना संधीही दिली आहे. पण आता 24 वर्षीय श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळेल असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले, ‘आम्ही मागील दोन वर्षांमध्ये ज्या भागांवर लक्ष केंद्रित केले तिथे आम्ही शक्य तेवढ्या युवा खेळाडूंना संधी दिली. उदाहर्णार्थ श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर यापुढे खेळेल.’

नुकत्याच वेस्ट इंडीज विरुद्ध पार पडलेल्या वनडे मालिकेत अय्यरला संधी मिळाली होती. पण त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. तसेच त्याने त्याला मिळालेल्या संधीचा उपयोग करत या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत अनुक्रमे 71 आणि 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. 

या मालिकेत युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली होती. मात्र त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही. 

अय्यरने या मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीचे भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही कौतुक केले आहे.

त्याचबरोबर युवांना अधिक संधी देण्याबद्दल शास्त्री पुढे म्हणाले, ‘जर आपण दीर्घकालीन दृष्टीकोनातून काही गोष्टींकडे पहात आहोत तर राखीव खेळाडूंचे सामर्थ्य हे सर्वकाही आहे. ताजेतवाने, युवा प्रतिभेचा प्रवाह सातत्याने इथे असावा.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

आता विराट कोहलीही मारणार विराट कोहली स्टॅंडमध्ये षटकार

टीम इंडियाला विंडीजमध्ये धोका, हल्ल्याच्या मेलमुळे टेन्शन वाढले

टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकासाठी ही ७ नावे झाली शॉर्टलिस्ट