भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा

विंडीजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांची भारताविरुद्ध वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना तिरुअनंतपुरम येथे होणार आहे.

त्यामुळे या सामन्यासाठी विंडीज आणि भारतीय संघ आज(30 आॅक्टोबर) तिरुअनंतपुरम येथे दाखल झाला आहे.

या मालिकेत अनेक विक्रम झाले. याचप्रमाणे शेवटच्या सामन्यातही अनेक विक्रम होणार आहे. त्यातील काही खास विक्रम असे- 

– भारताने जर ही मालिका जिंकली तर भारतात सलग ६ वनडे मालिका जिंकण्याचा टीम इंडिया पराक्रम करणार आहे. भारताचा २०१५-१६मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून ३-२ असा वनडे मालिकेत पराभव झाला होता. त्यानंतर भारतीय संघ अपराजित आहे.

-भारताकडून वनडे मालिकेत १० हजार धावा करण्यासाठी धोनीला केवळ एका धावेची गरज आहे. त्याने भारताकडून वनडेत ३२८ सामन्यात ४९.७४च्या सरासरीने ९९९९ धावा केल्या आहेत.

-वनडे सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनण्यासाठी विराट कोहलीला केवळ ९१ धावांची गरज. सध्या विराटचे वनडेत १०१९९ धावा असुन त्याच्यापुढे तिलकरत्ने दिलशान आहे. दिलशानने वनडेत ११२९० धावा केल्या आहेत.

-विंडीजविरुद्ध वन-डेत सर्वाधिव धावा करणारा खेळाडू होण्यासाठी विराटला १२३ धावांची गरज आहे. विराटने ३१ सामन्यात ६९.५०च्या सरासरीने १८०७ धावा केल्या आहेत. विराटपुढे पाकिस्तानचा दिग्गज माजी खेळाडू जावेद मियाॅंदाद आहे. त्याने ६४ सामन्यात ३३.८५च्या सरासरीने १९३० धावा केल्या आहेत.

-विंडीजविरुद्ध वनडेत १ हजार धावा करण्यासाठी धोनीला केवळ ५१ धावांची गरज. त्याने ३७ सामन्यात ५२.७२च्या सरासरीने ९४९ धावा केल्या आहेत. त्याने जर या ५१ धावा केल्या तर विंडीजविरुद्ध हजार धावा करणारा तो ६वा भारतीय तर जगातील २०वा खेळाडू ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या:

या १४ वर्षीय क्रिकेटपटूची वादळी खेळी, चोपल्या नाबाद ५५६ धावा

कालच बाप झालेला शोएब मलिक आज क्रिकेटच्या मैदानात

यजमान नाशिक विरुद्ध रत्नागिरी सामन्याने होणार राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला सुरवात, यावर होणार थेट प्रेक्षपण !

२०१८मध्ये राशिद खानला मागे टाकण्याची कुलदिपला संधी

विंडीज संघाचे केरळात नारळपाणी देत ढोल ताशांच्या निनादात जंगी स्वागत, पहा व्हिडिओ

कार्तिक आणि पंत या दोघांपेक्षा धोनीच भारी…तरीही टी२०मधुन वगळले

देश आधी… रोहितने चाहत्यांना मैदानातूनच दिला संदेश, पहा व्हिडीओ