अंडर १७ फुटबॉल: भारताला पुन्हा करावा लागला पराभवाचा सामना

कोलंबिया विरुद्ध १-२ असा झाला पराभव,

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु मैदानावर भारताचा दुसरा सामना कोलंबिया बरोबर रंगला. दोन्ही संघांना अंतिम १६ मध्ये स्थान मिळवण्यासाठी विजयाची खूप गरज होती आणि त्यानूसारच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.

भारताला विश्वचषकातला पहिला गोल नोंदवण्यात यश मिळाले पण त्याचे रुपांतर विजयात करण्यात अपयश मिळाले. शेवटी १-२ असा पराभव भारताच्या पदरी पडला.

पहिल्या हाफ पासूनच कोलंबियाने खेळावरचा आपला ताबा सोडला नाही. खूप कमी वेळा चेंडू भारताच्या ताब्यात होता, त्यातच १६ व्या मिनिटाला अभिजीत सरकारने कोलंबियाच्या २ डिफेन्डर्सना चकवत गोल करायचा प्रयत्न केला पण कोलंबियाच्या गोलकिपरने उत्तम रित्त्या गोल वाचवला.

कोलंबियाचे २ भक्कम अटॅक अनुक्रमे ३६ आणि ४२ व्या मिनिटाला भारताचा गोलकिपर धिरजने हाणून पाडले. पहिला हाफ ०-० असा बरोबरित सुटला.

दुसऱ्या हाफच्या ४९ व्या मिनिटाला जुआन पेन्लोझाने डाव्या काॅर्नरला खाली मारत ०-१ अशी कोलंबियाने आघाडी घेतली. ७६ व्या मिनिट ला जेक्सनने दिलेल्या पासची अनिकेतने उत्तम संधी तयार केली पण त्याचे गोल मधे रुपांतर करण्यात नाओरिमला अपयश आले.

ही भारतासाठी आपला पहिला वर्ल्ड कप गोल नोंदवायची एक  सुवर्णसंधी होती मात्र ती नाही होऊ शकली.

अवघ्या ६ मिनिटानंतर ८२ व्या मिनिटाला मिळालेल्या काॅर्नर किकला स्टॅलिनने बाॅक्सच्या मधोमध असलेल्या जॅक्सन सिंगकडे मारली आणि जॅक्सनच्या हेडरने भारतासाठी वर्ल्ड कप गोलचे खाते उघडले.

पण हा आनंद क्षणिक राहिला. २ च मिनिटानंतर ८४ व्या मिनिटला परत पेन्लोझाने गोल करत कोलंबिया ला १-२ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

आपणास माहित नसेल तर:
# भारताचा गोलकिपर धिरजचे प्रदर्शन पाहून त्याच्यावर मॅनचेस्टर सिटी आणि अर्सेनलचे लक्ष आहे.
# आज त्याच्या गोलकिपिंगने सचिन तेंडुलकरला सुद्धा प्रभावित केले. त्याने ट्विट करुन धिरजचे कौतुक केले.

नचिकेत धारणकर

(टीम महा स्पोर्ट्स)