विश्वचषक २०१९: भारत-न्यूझीलंड सामना होऊ शकतो रद्द, जाणून घ्या कारण

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात सध्या सतत पावसाचा व्यत्यय येत आहे. त्यामुळे पावसाचे संकट गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावरही आहे. हा सामना गुरुवारी ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅममध्ये होणार आहे.

मागील दोन दिवसांपासून इंग्लंडमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज दोन्ही संघाचे सराव सत्र होणार होते. पण तेही कदाचीत रद्द होऊ शकतात. स्थानिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस येथे पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

आयसीसीच्या नियमानुसार दोन्ही संघांची कमीत कमी प्रत्येकी 20 षटके पूर्ण व्हायला हवीत. त्याच्यापेक्षा कमी षटकांचा सामना झाल्यास हा सामना अनिर्णित घोषित केला जाईल. तसेच दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल.

याआधीच पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघातील सामना आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज यांच्यातील सामने पावसामुळे झालेले नाही. तसेच आज(11 जून) होणारा बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यावरही पावसाचे संकट आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…तर युवराजला खेळता आला असता निवृत्तीचा सामना

टीम इंडियाला मोठा धक्का, शिखर धवन विश्वचषकातून बाहेर