चालू सामन्यातच एयर अॅम्बुलन्स थेट क्रिकेटच्या मैदानात

लंडन। सोमवारी झालेल्या काऊंटी क्रिकेट चॅम्पियनशीपमधील लॅंकेशायर विरूद्ध एसेक्स सामना एक तास थांबवण्यात आला.

ओल्ड ट्रॅफोर्डवर सुरू असलेल्या या सामन्याच्या वेळी प्रेक्षकांमधील एकाची तब्येत बिघडल्याने हे एयर अॅम्बुलन्स आले होते.

मैदानात आलेल्या एयर अॅम्बुलन्समुळे हा सामना पुढे ढकलला गेला. मेडिकल स्टाफकडे दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने त्यांनी हे अॅम्बुलन्स मैदानातच उतरवली.

पंचाना या गंभीर स्थितीची जाणीव झाल्याने त्यांनी हा सामना लगेच थांबवला. पॅरामेडिक्सना त्या रूग्णाला अॅम्बुलन्समध्ये नेण्यास जवळ जवळ अर्धा तास लागला.

याबद्दलची माहिती लॅंकेशायर संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली. यात त्यांनी असे लिहले, “प्रेक्षकामध्ये एकाची तब्येत बिघडल्याने सामना थांबवण्यात आला. यामुळे एयर अॅम्बुलन्स मैदानात उतरवण्यात आले.”

“त्या प्रेक्षकाच्या स्थितीविषयी सध्या तरी काहीच माहिती मिळाली नाही. तो रूग्ण लवकर बरा व्हावा हीच अपेक्षा आहे.”

लॅंकेशायरने त्यांच्या दोन डावात 301 आणि 105 धावा केल्या तर एसेक्सने त्या बदल्यात 302 आणि 108-5 अशा धावा केल्या.

हा सामना एसेक्सने 5 विकेट्सने जिंकला. यामधील पहिल्या डावात इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकने एसेक्सकडून खेळताना 58 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय गोलंदाजामुळेच भारतीय संघ येणार कसोटी सामन्यात अडचणीत!

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय फलंदाजांसाठी ही आहे मोठी बातमी

विजेतेपदाची आठवण म्हणून बनवुन घेतला चक्क टॅटू

टीम इंडियातून फिटनेसमुळे संजू सॅमसन आऊट, हा मोठा खेळाडू इन!