आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारा क्रिकेटर करणार क्रिकेटला अलविदा

श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज रंगना हेराथने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱी इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे.

याबद्दल हेराथ म्हणाला, ” यावर्षीच्या शेवटी होणारी इंग्लंड विरुद्धची मालिका कदाचीत माझी शेवटची मालिका असेल. सध्या होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या ंमालिकेनंतर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी 3 महिने आहेत. सध्यातरी माझी हिच योजना आहे.”

“प्रत्येक क्रिकेटपटूच्या जीवनात अशी वेळ येते की त्याला खेळणे थांबवावे लागते. मला असे वाटते की माझ्यासाठी ती वेळ आली आहे. मी इतक्या दिवस क्रिकेट खेळल्याचा मला आनंद आहे.”

याबरोबरच 40 वर्षीय हेराथ म्हणाला, “या 18 वर्षांच्या काळात मी 7 वर्ष श्रीलंकेसाठी क्रिकेट खेळू शकलो नाही. पण या 7 वर्षात मी जे केले त्याचा मला अभिमान आहे. मी जो सराव केला आणि विशेष म्हणजे माझी जी इच्छा होती.”

हेराथने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून 2016 मध्येच निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर हेराथने कसोटीत 24.29 च्या सरासरीने 121 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच हेराथ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

त्याने आत्तापर्यंत क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात श्रीलंकेकडून 28.52 च्या सरासरीने 510 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्यातील तब्बल 418 विकेट्स त्याने कसोटी क्रिकेटमध्ये घेतल्या आहेत. तो श्रीलंकेचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्यामध्ये मुथय्या मुरलीधरननंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.

श्रीलंकेची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 जुलैपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

-इशांत शर्माने सांगितला धोनी आणि कोहलीमधील फरक

-टी20मध्ये केल्या २७० धावा, आयसीसी म्हणते तरीही हा विक्रम नाही

-गांगुली म्हणतो, विराट तू वनडेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कर!