हे आहेत एनबीएमधील पाच उत्कृष्ट कॅनडियन खेळाडू

स्प्रिंगफील्ड हे कॉलेज नॉर्थ कॅनडामध्ये मोडले जाते. बास्केटबॉल खेळाची सुरुवात येथून झाली परंतु आजकाल सर्वजण बास्केटबॉल हा खेळाला अमेरिकन खेळ म्हणूनच ओळखतात.  बास्केटबॉलचे संस्थापक डॉ जेम्स नाइझिथ यांचा जन्म ओंटारियो, कॅनडा येथे झाला असून बास्केटबॉल खेळाचा शोध त्यांनी ते ३० वर्षांचे असताना लावला. एनबीएचे संघ बास्केटबॉल जेथे खेळतात त्या हॉलचे नावही नाइझिथ मेमोरियल बास्केटबॉल ऑफ फेम असे ठेवण्यात आलेले आहे. परंतु जुने ते सोने म्हणतात तसे आपण आज हे पाच उत्कृष्ट कॅनडियन खेळाडू पाहुयात.

पाच उत्कृष्ट कॅनडियन खेळाडू:

# त्रिस्टान थॉम्पसन-
त्रिस्टान थॉम्पसन हा क्लीवलैंड कैवलियर्स संघाचा खेळाडू असून त्याने एनबीएमध्ये २०११ पासून खेळण्यास सुरुवात केली. तो सलग सहा मोसम खेळणारा खेळाडू म्हणून यादीत नाव असणारा खेळाडू आहे. २०१६ मध्ये क्लीवलैंड कैवलियर्स संघाने चॅम्पिअनशिप जिंकली होती तेव्हा त्रिस्टान थॉम्पसन हा संघात महत्वाचा खेळाडू मानाला जातो. त्याची प्रतिभा म्हणजे संघामध्ये तो राबाऊंडिंग आणि डिफेन्सर म्हणून खेळतो.त्याने सिद्ध केल आहे की संघामधला तो बहुमोल मालमत्ता असणारा खेळाडू आहे. सध्या तो २०१७ च्या रुकी मोसमाची तयारी करत आहे.

# जमाल मैग्लोयर
जमाल मैग्लोयर हा सलग एनबीएमधील मोसम खेळणारा खेळाडू होता त्याने १२ वर्षात ६ संघ बदलेले असून सुरुवातीला तो न्यू ऑर्लीन्स हॉर्नेट या संघात खेळात होता. नंतर मियामी हीट, मिलवॉकी बक्स,पोर्टलैंड ट्रेल ब्लेजर्स, डलास मेवेरिक्स, न्यू जर्सी नेट, टोरंटो रैप्टर्स ही होती. तो पहिला कॅनेडियन आहे ज्याची ऑल स्टार खेळासाठी निवड केली होती. २०११-१२ ला टोरंटो रैप्टर्स साठी खेळणारा तो पहिला कॅनेडियन आहे. सध्या तो या संघाचा सहाय्यक प्रशिक्षक आहे.

#एंड्रयू विगिन-
मिनियासोटा टिम्बरवॉल्वस या संघात खेळत असून संघामध्ये तो शूटिंग गार्ड पदावर खेळतो.एनबीएमध्ये त्याने २०१४ पासून खेळण्यास सुरुवात केली जो त्याचा पहिला संघ आहे तोच आतापर्यंत ठेवला आहे जरी त्याला कोणतीही चॅम्पिअनशिप मिळाली नाही किंवा ऑल स्टार मध्येही त्याची निवड झाली नाही तरी ऐक कॅनडियन खेळाडू म्हणून यादीमध्ये त्याचा ३ क्रमांक लागतो. पाहिजे त्या पेक्षा कमी पारितोषिके त्याच्याजवळ असली तरी तो आपल्या खेळामध्ये खूप जलद सुधारणा करत आहे. असे मिनियासोटा टिम्बरवॉल्वस प्रशिक्षक टॉम थिबोडू यांनी म्हटले आहे.

# रिक फॉक्स-
बॉस्टन सेल्टिक या संघामध्ये रिक फॉक्सने खेळण्यास सुरुवात केली होती. एनबीएमध्ये १९९१ पासून खेळण्यास सुरुवात केली. बॉस्टन चेल्टिक्स या संघाने १९९२ साली ऑल रुकी ही फक्त रिक फॉक्स याच्या वयक्तिक यशामुळेच मिळविणे शक्य झाले होते. सुरुवातीचे ६ वर्ष फक्त तो या संघाबरोबर खेळाला त्यानंतर त्याने लॉस एंजेल्स लेकर्स या संघासोबत १९९७ पासून खेळण्यास सुरुवात केली.

# स्टीव नैश-
स्टीव नैशने एनबीएमध्ये १९९६ पासून खेळण्यास सुरुवात केली. सर्वात आधी तो फीनिक्स संन्स या संघामध्ये खेळत होता. त्यानंतर त्याने ४ संघ बदले. डलास मेवेरिक्स, लॉस एंजेल्स लेकर्स परत त्याने फीनिक्स सनस या संघाबरोबर खेळण्यास सुरुवात केली. २००५,२००६ सलग २ वेळा एनबीएचा सर्वात चांगला खेळाडू म्हणून पारितोषिक मिळविले आहे.तर ८ वेळा ऑल स्टार, ७ वेळा ऑल एनबीए अशी पारितोषिके त्याच्या नावावर आहेत. तसेच ५ वेळा तो एनबीएचा सहायक म्हणून राहिलेला आहे. सध्या तो कॅनडा राष्ट्रीय संघाचा महाव्यवस्थापक आहे. तसेच गोल्डन स्टेट वॉरियर्स या संघाचा विकास सहायक म्हणून सदस्य ही आहे.