हा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीचा संघ !

आशिष नेहरा आणि दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत दणदणीत विजय मिळवून भारताने आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पुन्हा एकदा पटकावले आहे. भारत आता कसोटी बरोबरच वनडे मध्येही पहिल्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या ७ तारखे पासून, भारत ऑस्ट्रलिया विरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या ही मालिकेत भारत विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.

वनडे मालिकेप्रमाणेच टी-२० मालिकेतही भारताने आपले प्रमुख फिरकी गोलंदाज अश्विन आणि जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. वनडे आणि टी-२० दोनीही फॉरमॅटमध्ये मागील काही सामन्यात भारताचच्या या स्टार गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. विशेष म्हणजे आशिष नेहरा आणि दिनेश कार्तिक या खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे.

भारताचा अनुभवी डावखुरा फलंदाज युवराज सिंगला याही मालिकेत संधी देण्यात आलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताच्या विंडीज दौऱ्यात युवराज होता, ज्यात त्याला काही चमकदार कामगिरी करून दाखवता आली नाही. त्याच बरोबर भारत आता २०१९ च्या विश्वचषकासाठी संघ बांधणी करत आहे युवराजचे वय आणि फॉर्म बघता तो हा विश्वचषक खेळणार का यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे.

भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज शिखर धवनने टी-२० संघात पुनरागमन केले आहे. वयक्तिक कारणांमुळे तो वनडे मालिका खेळला नव्हता. त्याच्या जागी खेळलेल्या अजिंक्य रहाणेला सातत्याने चांगल्या कामगिरी नंतरही बसवण्यात आले आहे.

भारताचा संभाव्य संघ यातून निवडला जाईल:

संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंग धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यज्वेंद्र चहल, जसप्रित बूमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, अक्षर पटेल.