फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी असा आहे महाराष्ट्राच्या महिलांचा संघ

मुंबई । ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघाची आज घोषणा झाली. या संघाचे नेतृत्व मुंबई उपनगरची सायली जाधवकडे कायम ठेवण्यात आले आहे.

१२ खेळाडूंच्या संघात अभिलाषा म्हात्रे, सुवर्णा बारटक्के, कोमल देवकर, स्नेहल शिंदे, सायली केरिपाले, ललिता घरात, पूजा शेलार, चैताली बोऱ्हाडे, सायली जाधव (कर्णधार), तेजस्वी पाटेकर, श्रद्धा पवार आणि आम्रपाली गलांडे यांचा समावेश आहे.

संघ व्यवस्थापक म्हणून हिमाली धोलम तर प्रशिक्षक सुहास जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

सायली जाधवच्या नेतृत्वाखाली महिलांच्या संघाने ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.